आयुर्वेद

आयुर्वेद हे भारताचे प्राचीन वैद्यक असून सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात शाश्वत असा आशेचा किरण आहे. आयुर्वेदाचे ध्येयच मुळी प्रथम स्वस्थ माणसाने स्वास्थ्य टिकवणे आहे. माणसाने आजारी पडूच नये म्हणून मझीर्शींशपींर्ळींश चशवळलळपशफ हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी सांगितली आहेत.
स्वस्थ म्हणजे नक्की कोण ? तर सुश्रुताचार्य सांगतात की, ज्याचे वातपित्तकङ्ग हे दोष, जाठराग्नि हे समस्थितीत आहेत, ज्याच्या सप्तधातू, मलमूत्रादि क्रिया संतुलित आहेत व ज्याचे मन, आत्मा व इंद्रिये प्रसन्न आहेत तो स्वस्थ.
योग्य वेळी भूक लागून अन्न खाल्ले गेले पाहिजे. खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन झाले पाहिजे. शरीरात जडपणा, आळस नसला पाहिजे. मल, मूत्र, अपानवायू याचे निस्सःरण नियमित व विनात्रास झाले पाहिजे, वजन न वाढता शरीराचे बल वाढले पाहिजे. योग्य वेळी गाढ झोप लागून शरीरासोबत ममेंदूफही झोपला पाहिजे. झोपेतून जागे झाल्यावर ताजेतवाने वाटले पाहिजे. या सर्व क्रिया नैसर्गिकपणे होऊन आपली कांती, उत्साह, व कार्यक्षमता वाढली पाहिजे.
या शारीरिक स्थितीसोबत मनाचीही सत्व-रज-तमाची समतोल स्थिती असावी. रज, तमासोबत येणारे मनाचे दौर्बल्य कमी होऊन आत्मविश्वासपूर्ण शरीरावर ताबा असणे.
या शरीर व मानस स्थितीच्या संयोगाला खर्या अर्थाने मस्वस्थफ म्हणावे.