व्याधीप्रतिकारशक्ती आणि निसर्ग

माणसाचे आयुष्य पहाता हितकर गोष्टींपेक्षा सुखकर गोष्टींकडे मनुष्याचा कल वाढू लागला आहे. आयुष्याला कायमच चांगल्या व उपकारक अशा गोष्टींना हितकर म्हणतात. उदा. दिनचर्या-ऋतूचर्या पालन. क्षणिक चांगल्या वाटणार्या गोष्टींना सुखकर म्हणतात. जसे पावसाळ्यात थंडगार आईस्क्रीम खाणे. हितकर गोष्टी सुखकर असतीलच असे नसते आणि सुखकर गोष्टी हितकर असतीलच असेही नाही. सकाळी उठून लवकर व्यायाम करावा हे हितकर असते, पण साखरझोपेत लोळत पडणे सुखकर !!!
तरीही बर्याचशा व्यक्तींमध्ये मानसिक, आर्थिक इत्यादी सुखांप्रमाणे शरीरसंबंध सुखेही भरपूर मिळतात. त्यांना अपथ्यसेवन करूनही सहसा रोग होत नाहीत. कारण शरीराच्या जडणघडणीमध्ये उत्तम प्रसादांश तयार होत असतो. शरीराचे धातुबल उत्कृष्ट प्रतीचे रहाते. या उलट काही व्यक्तींमध्ये कसोशीने पथ्यसेवन केले तरीही ते वारंवार व्याधीग्रस्त राहातात.
आयुर्वेदामध्ये कोणत्या भावांमुळे व्याधीक्षमत्व निर्माण होते हे न सांगता व्याधी सहन न करू शकणार्यांचे तसेच कोणते घटक विकृत झाल्यास व्याधीक्षमत्व कमी होते, याचे वर्णन केले आहे. प्रत्येक मनुष्याचे स्वतःचे बल, ओज व अग्नि इत्यादी घटक उत्कृष्ट असावे लागतात.
व्याधी ज्यामुळे होतात त्या कारणांशी संबंध आला की, शरीरात विकृती किंवा व्याधी उत्पन्न करण्याकडे त्यांचा कल असतो. परंतु त्याचवेळी शरीराचा मात्र व्याधी उत्पन्न न होऊ देण्याकडे प्रयत्न असतो. हा प्रयत्न म्हणजेच व्याधीक्षमत्व. हा प्रयत्न दोन प्रकारचा असू शकतो. एक म्हणजे व्याधी उत्पन्न होऊ न देणे आणि दुसरा म्हणजे व्याधी झाली तरी ती बलवान होऊ न देणे. म्हणजेच व्याधीच्या बळाला विरोध करणे. म्हणूनच व्याख्या –
॥ नाम व्याधिबलविरोधित्वं व्याध्युत्पादकप्रतिबंधक त्वमिति |
चक्रपाणी यांची उदाहरणे खूप छान पद्धतीने मनुस्मृती व महाभारतातही आढळतात. ज्याप्रमाणे शेतात न पडता खडकात पडलेले बीज रूजत नाही. गवतावर न पडता दुसर्या ठिकाणी पडलेली आग आपोआप विझते त्याप्रमाणे शरीरात उत्तम व्याधिक्षमत्व असताना कारण झालेले हेतू वाया जातात… आजार निर्माण करत नाही.
आपण आज व्यवहारात व्याधी प्रतिकारशक्ती खूप कमी झालेली पहातो. निःसत्व अन्न, व्यायामाचा अभाव, अत्याधिक प्रतिजैवके प्रदूषण यामुळे मऍलर्जिकफ गोष्टींची संख्या वाढतीय. श्वासमार्गाच्या व्याधींची संख्या जास्त आढळून येते. लहानपणापासून मुलांवर औषधांचा मारा केला जातो. त्यामुळे त्यांची प्राकृतिक, नैसर्गिक वाढ नीट होत नाही. या सर्वांच्या मुळाशी शरीराचे व्याधिक्षमत्व असते. व्याधीक्षमत्व हे काहींना जन्मासह मिळते याला मसहजफ (लू लळीींह – कशीशवरींेीू) असे म्हणतात. तर काहींना बलपूर्वक प्रयत्नपूर्वक मिळवावे लागते. ते संपूर्ण शरीराचे असू शकते किंवा एका विशिष्ट आजाराचे किंवा अवयवाचे अथवा स्रोताचे (डूीींशाळल) असू शकते.
बर्याचदा प्राणीमात्रांमध्ये सहज अथवा स्वाभाविक व्याधिक्षमत्त्व दिसते. उदा. कोंबडीला धनुर्वात किंवा कुत्रा, शेळी, उंदीर यांना क्षयरोग होत नाही. त्यामुळे त्यांचा सहवास त्यांचे दूध, तूप, रक्त व मांससेवन या रोगाचा नाश करू शकते. ही त्या प्राण्याची नैसर्गिक क्षमता आहे. याशिवाय एकाच प्रजातीत नर-मादी भेदाने ती कमी-अधिक असू शकते. वैयक्तिक व्याधिक्षमत्त्व हे इतर प्राण्यांपेक्षा मानवात ही अधिक आढळते. आईवडिलांकडून बीजांमधून रचना विशेषत्वाने येते ते वारंवार आजारी होत नाही. उदा. पंजाबी लोक हे अत्यंत आरोग्यपूर्ण असतात. एखाद्या विशिष्ट आजारामुळेही व्याधिक्षमत्त्व निर्माण होऊ शकते. कोणतीही व्याधी झाल्यानंतर त्याविरूद्ध शरीर लढा देते. तो जोरदार असेल तर रोगी लवकर रोगमुक्त होतो. नाहीतर दगावतोही ! रोगावस्थेत आलेली ही क्षमता रोगमुक्तीनंतर स्थायी किंवा अस्थायी रूपात राहाते. उदा. देवी, गोवर, गालगुंड, प्लेग, ङ्गिरंग व्याधीत आलेली व्याधीक्षमता आयुष्यभर टिकून रहाते. इनफ्लूएन्झा, न्यूमोनिया, कॉलरा या व्याधीत आलेली क्षमता कालांतराने कमी होते. ह्या व्याधी पुनश्च होऊ शकतात.
प्रतिकारशक्ती संबंधित मबलफ ही संकल्पना आयुर्वेदाने मांडली आहे. बलाचे तीन प्रकार, ते वाढवण्यासाठीचे प्रयत्न यांचा विचार चरकाचार्यांनी मांडला आहे.
सहज बळ – हे जन्मापासून मात्यापित्यांच्या उत्तम स्त्री-पुरूष बीजांपासून मिळते. कोणत्याही धातूंची, हेतूंची अपेक्षा न करता शरीर धातूवृद्धीबरोबर ते आपोआप वाढते. शारीरिक व मानसिक अशा दोन प्रकारचे ते असते. बलवान पुरूषांच्या देशांत जन्म होणे यामुळे सहज बळ चांगले निर्माण होते. आयुर्वेदाने चांगल्या पूर्वकर्मांचाही सहभाग अपेक्षित धरला आहे.
कालज बळ – थंडीत तब्येत चांगली रहाणे, उन्हाळ्यात आजारांचे प्रमाण वाढणे इ. यामध्ये ऋतू व वय या अनुसार २ भाग केले जातात. तरूणपणी, चांगल्या देशात जन्म होणार्यांमध्ये हेमंत व शिशिर ऋतूंमध्ये चांगले बळ निर्माण होते.
युक्तीकृत बळ – यामध्ये उत्तम प्रकारचा आहार, व्यायाम, योग्य विश्रांती, रसायन प्रयोग व स्वस्थवृत्तातील आहार-नियमांचे पालन करणे यावर अवलंबून असते. शरीरभावपोषक सर्व द्रव्यांनी युक्त असा समतोल किंवा युक्त आहार असल्याने तत् शरीरभावांचे योग्य पोषण होऊन धातूसार उत्तम राहाते. दुष्काळ, युद्ध, कैद, बेपत्ता होणे इत्यादींमध्ये निकृष्ट आहार मिळाल्याने बल उणावलेले आढळते.
याशिवाय बल-अबलाचा विचार करताना मशरीरसंपत्फ हा मुद्दा मांडला आहेत. ग्रंथकारांनी यासाठी परिमाणे दिलेली आहेत. याला मअंगुलीफ प्रमाण म्हणतात. या परिणामात न बसणारी आठ प्रकारची व्यक्ती प्रकार हे निंदीत सांगितले आहेत. यामध्ये अलोम, अतिलोम (अंगावर अधिक | कमी केस असणे), अतिदीर्घ, अतिर्हस्व (खूप उंच | खूप बुटके), अतिगौर अतिकृष्ण (खूप गोरे | काळे) अतिस्थूल, अतिकृश (अधिक जाड किंवा बारीक) या आठ प्रकारांचा समावेश आहे. या शरीरांमध्ये मांस, रक्त व अस्थि या धातूंचे दौर्बल्य असते. शरीरांचे उपचय – वाढ नैसर्गिक झालेली नसते. मनाची ताकदही कमी असते. यांचा हीन व्याधिक्षमत्व प्रधान व्यक्तींमध्ये समावेश होतो.
याखेरीज एक सात्म्य – असात्म्यज ही संकल्पना आयुर्वेदाने मांडली आहे. आज ऍलर्जी म्हणून जो उहापोह होतो, तो सात्म्य या संकल्पनेत हजारो वर्षांपूर्वी आचार्यांनी केला आहे. ज्यावेळी आपण आहार/औषध स्वरूपात काही द्रव्य शरीरात घेतो तेव्हा ते सर्वच शरीराशी मिळतेजुळते असतातच असे नाही. अनेक बाबतीत त्या पदार्थांचे शरीराशी साधर्म्य असले तरी विशिष्ट बाबतीत वैधर्म्य असू शकते. या विविध प्रकारांना शरीरपदार्थांशी सामावून घेऊन आत्मसात करण्याच्या प्रवृत्तीला मसात्म्यफ करणे म्हणतात. जे सर्व रसांचे पदार्थ सेवन करू शकतात त्यांचे बल उत्तम अथवा सर्वरससात्म्य असल्याने त्यांच्या शरीरातील धातूंची पुष्टी होत असते. याउलट बहुतेक रस असात्म्य असल्याने सात्म्य असलेल्या ङ्गक्त काही रसांचे पदार्थच जे सेवन करतात, अशांना हीनसात्म्य किंवा एकरससात्म्य असते. या पुरूषांचे बळ हीन असते. कारण ङ्गारच थोड्या प्रकारच्या पदार्थातून त्यांच्या शरीराचे पोषण होत असते. उत्तम सात्म्य असलेल्या मनुष्यांचे बळ चांगले असल्याने त्यांना सर्व प्रकारची औषधे देता येतात. पर्यायाने व्याधी लवकर बर्या होतात. ज्याला आपण ऍलर्जिक रिऍक्शन म्हणतो अशा व्यक्तींमध्ये सात्म्यसंपत् जेवढे कमी असेल तेवढ्या प्रमाणात बाह्य भावपदार्थांमध्ये त्या विरोधी घटकांमध्ये लढा होतो. विकृती निर्माण होते. पित्तप्रकोप होतो. यालाच ऍलर्जिक चरपळषशीींरींळेपी म्हणतात. हे आहार, औषधे, ङ्गुले, ङ्गुलांचे परागकण (झेश्रश्रशपी) धूळ, प्राण्यांचे दंश, वस्त्र, ऋतूमान, हवामान, अशा वेगवेगळ्या द्रव्यांमुळे होऊ शकते.
व्यवहारात हल्ली आम्ही डॉक्टर्स अशा खूप प्रकारच्या ऍलर्जीज पहातो. अशा प्रकारच्या असात्म्य गोष्टींचे वारंवार अल्पमात्रेत सेवन करीत राहिल्यास काही वेळा कालांतराने त्याविषयी सात्म्य संपत् वाढू लागतो. नेहमी वापरात येणारी प्रतिजैविकेही या परिस्थितीस निष्प्रभ ठरतात. आपली प्रतिकारशक्ती व व्याधिक्षमत्व निष्प्रभ ठरतात. आपली प्रतिकारशक्ती व व्याधिक्षमत्व वाढवून आपण स्वतःला व्याधीप्रभावापासून वाचवू शकतो. आयुर्वेद त्याची गुरूकिल्ली आहे !!!