सहा मूळ चवी

षट्+रस म्हणजेच जीभेने अनुभवता येणार्‍या सहा वेगवेगळ्या मूळ चवी. मूलभूत रस हे सहा आहेत. त्या रसांच्या संयोगाने विविध पदार्थ तयार होतात. या रसांचा मूळ अभ्यास केला तर सध्या बाजारात मिळणार्‍या विविध प्रांतातल्या वेगवेगळ्या देशी-विदेशी खाद्यपदार्थांचे गुणधर्म आपण लवकर समजू शकू. प्रत्यक्ष जीभेशी पदार्थाचा संयोग होताना मेंदूकडे ज्या संवेदना पोहोचवल्या जातात, त्या म्हणजे त्या पदार्थातील मूळ चवी. याला मरसफ अशी परिभाषा आयुर्वेदाने वापरली आहे.
याची शास्त्रोक्त परिभाषा समजावून घेऊ या. मरसफ हा जीभेचा विषय आहे. मरसनार्थे रसःफ म्हणजेच जीभ या ज्ञानेंद्रियाद्वारे आपल्याला कळतो. तो पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पाच महाभूतांद्वारे याची उत्पत्ती होते. सर्व आयुर्वेद चिकित्सा ज्या द्रव्यांवर – वनस्पतींवर अवलंबून असते. त्या वनस्पती त्यांच्या मरसफ या गुणधर्माद्वारे काम करत असतात.
मिरचीच्या तिखट गुणांमुळे तोंड भाजले की मधूर रसाची साखर आपण तोंडात टाकतो. म्हणजेच या सहा रसांची गंमत आपण रोजच्या आहारात व औषधांत रोजच अनुभवतो. आता याविषयीची थोडी अजून माहिती मिळवू. मधूर(गोड), अम्ल(आंबट), लवण(खारट), कटू(तिखट), तिक्त(कडू), कषाय(तुरट) अशा या सहा चवी आहेत.
१) मधूर (गोड)ः- ही चव पृथ्वी व पाणी या महाभूतांपासून तयार होते. मधूर रसाची द्रव्ये तोंडात गेल्यावर तोंडाला चिकटतात, लेप केल्याप्रमाणे वाटतात. सर्व इंद्रियांना प्रसन्नता देतात. शरीराला सुख मिळाल्याप्रमाणे वाटते. मुंगळे, मुंग्या, माश्या, भुंगे, चिलटं या सर्वांना आवडतो.
हा गोड रस सर्वांना जन्मापासून हितकर असतो. आईचे दूध गोड रसाचे असते. त्याच्या सेवनामुळे रस, रक्त इत्यादी सर्व धातू वाढतात. आयुष्य वाढते. लहान मुले, म्हातारी माणसे, टी.बी.चे रूग्ण, कृश-अशक्त रूग्ण या सर्वांना आयुष्य वाढवणारा असा गोड रस असतो. त्यामुळे शरीराची शक्ती वर्णकांती, अकरा इंद्रिये, त्वचा, केस, कंठ (गळा) यांचे आरोग्य राखले जाते.
चक्कर येणे, भोवळ येणे, पित्त वाढणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, खूप तहान लागणे, शरीराला दृढता देणे, अस्थिभग्न अस्थि दुबळ्या असणे, स्त्रियांचे दूध वाढवणे अशा अनेक आजारांमध्ये उपयोगी पडतो. विषप्रयोग, पित्तविकृती यात उपयुक्त.
उदाः- गोड रस दूध, केळे, शतावरी, ऊस, कोहळा, गूळ, तूप, मध, तेल, द्राक्षे, आक्रोड, खजूर, नारळ, ङ्गणस, चारोळी, खारीक, ङ्गालसा, भुईआवळा अश्वगंधा, गोक्षूर इ.
अति प्रमाणात गोड रस खाल्ल्याने मेद (चरबी), अग्निमांद्य, जडपणा (सुस्ती), अजीर्ण, अलसक, अतिनिद्रा, दमा, प्रमेह, गळ्याचे रोग, बधीरपणा, तोंड गुळचट होणे, डोळ्याचे विकार मळमळणे, शिरःशुला, खोकला, सर्दी, कृमीरोग, ताप इत्यादी आजार जडू शकतात.
२) अम्ल (आंबट) ः- रस हा पृथ्वी व तेज या महाभूतांमुळे तयार होतो. आंबट रसाची द्रव्ये जीभेला स्पर्श होताच शिरशिरी येते. छाती, गळ्यात संवेदना जाणवते, तोंडाला पाणी सुटते (लिंबू, चिंच, कैरी) डोळे व भुवया आक्रसल्या जातात. दातांना कळ येते व शरीरावर रोमांच येतात.
आंबट रस हा वायुनाशक व वातानुलोमक आहे. पोटात जळजळ करणारा, रक्त व पित्त यांना दूषित करणारा, गरम वीर्याचा, थंड स्पर्श असणारा आहे. तो इंद्रियांना चेतनायुक्त बनवतो, तोंडाला चव आणतो, पाचन करतो, जाठराग्नी वाढवतो, बल व तृप्ती देतो. धातूंचे पोषण करतो. सर्व शरीरात लवकर पसरतो. आंबट रस पचायला हलका, स्निग्ध असल्याने हृदयाला हितकर आहे.
उदाः- डाळींब, आवळा, अंबाडी, क्षुद्र आंक्षा, महाळुंग, कोकम, चिंच, आंबट चुका, बोरं, लिची, ङ्गालसा, करवंदे, पेवंदी, उंबर, तिलकंटक, चांदी, दही, दह्याचे पाणी, ताक, कांजी, मद्य (दारू) आणि शिंपले हे आंबट रसाचे असतात.
आंबट रसाची द्रव्ये पितकर असतात याला अपवाद डाळिंब, आवळा हे पित्तशामक आहेत.
अतिप्रमाणात आंबट रस खाल्ल्याने शरीरात ढिलेपणा येतो, कङ्गाचे विलयन होते, खाज सुटते, पांडूरोग (रक्त कमी होते), वेदना व्रण पसरतात, नागीण, रक्तपित्त, घोळणा ङ्गुटणे, तहान लागणे, सूज इत्यादी विकार उत्पन्न होतात. हा गरम गुणाचा आहे. म्हणून अतिप्रमाणात सेवनाने भ्रम-चक्कर येते. शरीर कृश बनते. प्रत्यक्षात खूप लोणचे, खारावलेले आवळे किंवा विनाकारण आंबट खाणार्‍यांमध्ये ही लक्षणे आढळतात.
३) लवण (खारट)ः- ही चव पाणी व अग्नि या मविरूद्धफ महाभूताच्या संयोगातून तयार झाली आहे. खारट पदार्थ जिभेवर ठेवल्यास तोंड ओले होते (लाळ सुटते). गळा, गाल यांना लागल्यास जळजळ होते, अन्नाला चव येते.
खारट रस शरीराची स्तब्धता (जखडलेपणा) दूर करतो, कठीणपणा, घट्टपणा कमी करतो, सर्व रसांना मारक ठरतो, जाठराग्नी प्रखर करतो, पचनास मदत करतो, स्त्राव उत्पन्न करतो, शोषण करतो, स्नेहन करतो, घाम आणतो, मळाचे भेदन करतो, संधीबंधांना शिथिल करतो. कङ्गाला ढिले करतो.
उदाः सैंधवादि मीठे (सौवर्चल, सांबर, पादेलोण, काळे मीठ) यवक्षार इ. क्षार, कथील, शीसे इ.
मिठाच्या अतियोगाने डोक्याचे केस गळतात, पांढरे होतात, तहान, मुर्च्छा, दाह, त्वचारोग, लाल चट्टे उठणे, कोड, आकडी येणे, रक्तापि, विष व मद्य यांचा वेग वाढवणे व वातरक्त वाढणे हे विकार होतात. अतिमिठाने शक्तीचा र्‍हास होतो व ओज नष्ट होते. यालाच मपांढरे-विषफ असे सध्या म्हणतात.
४) तिक्त (कडू)ः- रस हा वायू आणि आकाश या हलक्या महाभूताने बनलाय. तो तोंड स्वच्छ करतो, कंठाचे शोधन करतो. त्याची चव घेतल्यावर इतर रसांची चव जीभेला कळत नाही.
जीभेला न आवडणारा कडू रस अरूचि, विष, कृमी, मळमळणे, चक्कर येणे, तोंडाला पाणी सुटणे, ताप, आग होणे, तहान, खाज येणे तसेच शरीरात मेद साठणे व अति मल मूत्रता या विकारांत उपयोगी पडतो.
अग्नि वाढवतो, पचन करतो, दोषांचे लेखन करतो, स्त्रियांचे दूधाचे दोष दूर करतो आणि वृद्धी वाढवतो.
उदाः चंदन, जटामांसी, हळद, दारूहळद, कडू चिराईत, धमासा इत्यादी.
अतिप्रमाणात कडू रस घेतल्याने धातूनाश व शक्तिनाश होतो. चक्कर, तहान, कोरडेपणा, खरखरीतपणा इत्यादी वाढते.
५) कटू (तिखट)ः- रस वायू आणि अग्नि या तीक्ष्ण महाभूतांनी बनला आहे. जीभेला चुणचुण, चरचर, आग होणे, पाणी सुटणे ही लक्षणे जाणवतात. त्याच्या सेवनाने तोंड, डोळे, नाक यातून पाणी वहाते.
तिखट मदत करतो, स्निग्धता व व्रणांतील ओलसरपणा वाळवतो. इंद्रियांमध्ये चैतन्य आणतो, गोठलेल्या रक्ताचे विलयन करतो. संधीबंधने मोकळी करतो, मलबद्धता कमी करतो, कङ्ग कमी करतो.
उदाः काळीमिरी, हिंग, मसाल्याचे पदार्थ, विडंग, मनशीळ, मुळा, मोहरी इत्यादी. अतिप्रमाणात तिखट खाल्ल्याने तहान, नशा, चक्कर, आग, जखडणे हे विकार होतात. शक्ती क्षीण होते, वीर्य व कंठ शोषण होतात. कंप, चक्कर, ज्वर, सुस्ती, मूळव्याध रक्तमूत्रता ही होते.
६) कषाय (तुरट)ः- ही चव वायू आणि पृथ्वी यांच्या संयोगाने बनली आहे. तुरट रस जीभेला आवळतो, बांधल्याप्रमाणे बनवतो. गळा आवळल्याप्रमाणे वाटतो, हृदयस्थानी बंध बसतो.
कङ्ग आणि पित्त कमी करतो. ताबडतोब बलबद्धता करतो. त्वचेला चांगला वर्ण देतो, ओलेपणा शोषून घेतो. थंड वीर्याचा असल्याने मनाला तृप्त करतो. व्रण भरून काढतो.
उदाः हिरडा, अनंतमूळ, आवळा, पद्मकाष्ट, आंबा, पिंपळ इत्यादी. अतिप्रमाणात तुरट रस सेवन केल्याने शुक्रधातूचा अवरोध होतो, पोट ङ्गुगणे, मांड्या जखडणे, मल कोरडा होणे, कृशता, वात-मल-मूत्र अडकणे, पक्षाघात इत्यादी व्याधी होतात.
या रसांच्या गुणधर्मांमुळे आपण आहार द्रव्यांचे गुणधर्म अभ्यासू शकतो. चायनीज, कॉंन्टिनेंटल, थाय ङ्गूड यांचे परिणाम-दुष्परिणाम आपल्याला लक्षणांवरून समजू शकतात. आयुर्वेदाने सहा रसांचा समतोल असणारा षड्रसयुक्त (आपला पारंपारिक भारतीय) आहार श्रेष्ठ सांगितला आहे.