परिपूर्ण स्त्री- वैद्यक विचार
यत्र नार्यः पूजन्ते, रमन्ते तत्र देवता
-मनुस्मृती….

स्त्रीचे महात्म्य मनुस्मृतीत वर्णिले आहे. प्राचीन काळापासून अनेक संस्कृतींमध्ये स्त्री-प्रधान मातृसत्ताक समाजाचे वर्णन आढळते. वैद्यकशास्त्रांनी स्त्रियांचा विचार ॠूपरशलेश्रेसू | जलीींीशींळली या शास्त्रात केला आहे. प्रसूतीशास्त्र हा स्त्री-शरीरशास्त्राचा अविभाज्य भाग आहे. आयुर्वेदशास्त्राने कौमारभृत्य हे एक स्वतंत्र अंग मानले आहे. त्याची व्याप्ती स्त्री-सौतिक-बाल अशी आहे. मातृत्त्व, बालकाचे पालनपोषण ही निसर्गाने स्त्रियांना दिलेली जबाबदारी असल्याने त्याचे विस्तृत वर्णन ग्रंथात आढळते.
आयुर्वेदात इतर व्याधी, रचनाशास्त्र, निदान यामध्ये स्त्रियांचा उल्लेख अंतर्भूत आहे, पण स्त्रियांच्या रचना विशेषामुळे तसेच रजस्वला, प्रसूता या अवस्थांमुळे अनेक व्याधीचिकित्सेत वेगळा विचार केलेला दिसतो.
आजच्या जगात आढळणारे नित्य आजार, मुलांच्या पोषणसंदर्भातील तक्रारी, प्रतिकारशक्ती, स्त्रियांच्या मानसिक दौर्बल्याची कारणे हजारो वर्षांपूर्वी ग्रंथकर्त्यांना ज्ञात होती. त्यामुळे त्यांनी त्यावेळी केलेले निर्देश व सिद्धांत आजच्या काळातही लागू आहेत. उदा. काही वर्षांपूर्वी मातृस्तन्य तसेच पिवळा चीक (लहेश्रर्शीींीीा) याच्या विरोधात असणारे आधुनिक शास्त्र आज पुन्हा आर्इेचेच दूध-बाळासाठी सांगत आहे, तर हजारोवर्षांपूर्वीच पहिले सहा महिने क्षीराद म्हणजे ङ्गक्त-आईच्याच दूधावरील पोषण प्रशस्त मानले गेले होते.
आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आपल्याला स्त्रियांबाबतच्या खालील वर्गीकरणातून दिसून येईल.
१) जन्मापासून बारा वर्षांपर्यंतचा काळ (बाला/कन्या)
२) बारा वर्षांपासून – सोळा वर्षांपर्यंत (शारीरिक वाढीचा काळ)
३) सोळा ते पन्नास वर्षांपर्यंत – शारीरिक परिपूर्णता असणारा काळ.
४) रजोनिवृत्ती काळ – गर्भधारणा करण्याची क्षमता संपल्यानंतरचा काळ.
प्रामुख्याने सध्या स्त्रियांच्या वाढत्या वजनाची तक्रार अनेकांसाठीचे उदरनिर्वाहाचे साधन झालेली दिसते. व्यायाम न करणे, पाळीच्या तक्रारी, अंगावरून कमी दिवस व कमी प्रमाणात जाणे, पाळी अनेक महिने उशीरा येणे किंवा ङ्गक्त गोळ्या खाऊनच येणे, चेहर्यावरची वाढती लव, काळपटपणा, पीसीओडी (बीजांडामध्ये गाठी होणे), थायरॉईडमुळे हॉर्मोन्सचे असंतुलन, नैराध्यामध्ये सतत खाणे यामुळे वजन, आकार नियंत्रित राहात नाही. त्याच्या न्यूनगंडामुळे तत्काळ, ताबडतोब वजन कमी करण्याच्या नादात अशक्तपणा ओढवून घेतला जातो.
स्त्रीशरीरातील स्रोतसे ही रजोस्त्रावामुळे शुद्ध होतात. त्यामुळे हृद्रोग व प्रमेह प्रमाणतः स्त्रियांमध्ये कमी आढळतात असे आयुर्वेद सांगतो. त्यामुळे रजःस्राव नियमन हे नैसर्गिकरित्या झाल्यास वजनाचा प्रश्न सुटू शकतो. पाळीपूर्वी ज्या स्त्रियांना उष्णता वाढणे, मूळव्याधस्वरूप त्रास होणे, छाती जड होणे व अंग ङ्गुगल्याप्रमाणे वाटणे ही लक्षणे दिसतात (झीशाशर्पींीीरश्र डूपवीेाश) त्यांना गर्भाशयाची टॉनिक असणारी औषधे काही काळ घेतल्याने ङ्गरक जाणवतो. नियमित व्यायाम व खाण्यामध्ये निवडक व आवश्यक प्रथिनांचा समावेश करणे व जंक ङ्गूड कमी करणे यामुळे वजनाची तक्रार, खूपशी आटोक्यात येताना दिसते.
स्त्रियांमध्ये अधोगुरूत्त्व कंबरेखालील भागात मोठी व जाड हाडे असल्यामुळे असते. त्यामुळे कंबर, नितंब, मांड्या याभोवती साठणारा मेद कष्टसाध्य असतो.
सध्या अनेकदा आढळणारी, महत्त्वाची, पण स्त्रियांकडून दुर्लक्ष केली जाणारी तक्रार म्हणजे श्वेतप्रदर – अंगावरून पांढरे जाणे (ङर्शीलेीीहशर) एक दोन दिवस होणारा हा पांढरा स्राव जरी खूप सामान्य असला, तरी दह्यासारखे अंगावरून जाणे, खूप खाज सुटणे, त्याला दुर्गंधी असणे, त्यामुळे कंबर, पोट, पाय दुखत रहाणे हे प्रतिकारशक्ती कमी करणारे असते. अशा मुलींमध्ये अस्थिधातू कमजोर राहू शकतो. सर्वांगीण वाढीवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
वंध्यत्व – मूल न होणे ही अतिबुद्धीवान लोकांची समस्या होऊ लागली आहे. कारण करिअर करताना विवाह होणारी वये तिशी ओलांडू लागली आहेत. सतत असणारी कामाची प्रेशर्स, नवरा-बायको दोघांची १०-१५ तासांची कामाची पद्धत, कौटुंबिक अपेक्षेमुळे बिघडलेली मनःस्थिती हे सध्या मुख्य कारण आयटी समाजात दिसत आहे. याशिवाय शुक्रजंतूंची संख्या कमी असणे, पीसीओएस, गर्भाशयातील उष्णता, स्त्रीबीज, सशक्त नसणे नैसर्गिकरित्या बीज बाहेर न पडणे या अनेक कारणांचे निराकरण वंध्यत्वाच्या चिकीत्सेत करावे लागते.
रजोनिवृत्तीचा काळ हा स्त्रीत्त्वजनित लक्षणांच्या निवृत्तीचा काळ समजला जातो. यामध्ये होणारे शारिरीक व मानसिक बदल जर त्या स्त्रीने व तिच्या कुटूंबियांनी समजवून घेतले तर ही पासिंग ङ्गेज ओलांडणे त्या स्त्रीला शक्य होते. हॉर्मोन्समधील असंतुलन, कमी होणारी हाडातील कॅल्शियमची लेव्हल याचा थोड्याशा औषधांनी चांगला ङ्गरक पडतो.
स्त्रियांच्या नवीनयुगांच्या नवीन सौंदर्य समस्या आज पहायला मिळतात. हेअर डायमुळे येणारी काळी रॅश, टॅनिंग, केस गळणे, पांढरे होणे, सौंदर्यप्रसाधने व त्यातील रसायनांचा अतिरेक यामुळे मूळचे सौंदर्य खूप कमी पहायला मिळते. अंतरिक शुद्धी, रक्तशुद्धीचे उपाय, काही हर्बल लेप यामुळे त्वचा, डोळे, केस यांचे आरोग्य चांगले राखले जाते.
आयुर्वेदाचे शक्तिस्थान आहे गर्भसंस्कार, गर्भिणी परिचर्या, प्रसूती, प्रसुतिपश्चात परिचर्या, बाळाच्या जन्मानंतर करावयाचे संस्कार याचे सुंदर व शास्त्रोक्त वर्णन आयुर्वेदात आहे. आई-वडील यांच्यातील अनुवंशिक व्याधी गर्भात कमी प्रमाणात यावे, बीजदोष कमी व्हावेत, अपत्याची शारिरीक व मानसिक वाढ सशक्त व्हावी यासाठी आईने नऊ महिने घ्यायची औषधे, आहार, टॉनिक्स, संस्कार, व्यायाम, मानसिक विकारांचे नियमन गर्भसंस्कारात आढळते. थोडक्यात गोरेपान, उंचेपूरे, चष्मा नसलेले, तल्लख बुद्धीचे अगदी ढरळश्रेी ारवश बाळ तुमच्या अपेक्षेप्रमाणे !!! हे सहज शक्य असते.
बाळंतपणानंतरचे ४० दिवस पाळायची पथ्ये, आहार, औषधे, चांगले दूध येण्यासाठीचे नव्हे तर आईचेही वजन कमी होऊन तिचे शरीर व मन पूर्ववत होण्यासाठी काही खास उपाय आयुर्वेदशास्त्र सांगते. स्तन्यपानात येणार्या अडचणी, दूधाच्या गाठी यासाठी झीर्शींशपींर्ळींश तसेच र्उीीरींर्ळींश (बरे करणारे) उपाय वर्णन केलेले आहेत.
आयुर्वेदाची खासियत अशी आहे की स्त्रियांच्या वयाच्या या वेगवेगळ्या टप्प्यांवर एक विशिष्ट परिचर्या (ीशसळार) सांगितली आहे. उदा. रजःस्वला अवस्थेत शारिरीक कष्ट अधिक करू नयेत. गर्भिणी अवस्थेत रात्री-अपरात्री बाहेर हिंडू नये. सहा महिन्यांच्या आतल्या बाळांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. प्रसूता स्त्रीने कोणत्याही वाहनाने लांबचा प्रवास करू नये. इत्यादी कारणांमुळे होणारे अपाय दिर्घकाळ शरीरावर दुष्परिणाम करतात. अतिप्रमाणात होणारा रजःस्राव हा अतिरिक्त पित्तामुळे असून तो थांबवल्यास पित्ताचे आजार बळावतात हे प्रत्यक्षात पहायला मिळते. त्यामुळे निदान करताना मुख्यतः अतिउष्णता, नाजूक शरीर, हळवे मन, ताणतणावाचा हार्मोन्सवर लवकर होणार परिणाम, पाळी पुढे मागे करताना बदलणारी मानसिक अवस्था त्या अनुषंगाने येणारे नैराश्य या विषचक्राचा विशेष विचार स्त्रियांच्या चिकीत्सेत करावाच लागतो.
बर्याचशा स्त्रिया या समुदपदेशानेच बर्या होताना दिसतात. निसर्गतः पुरूषांपेक्षा थोडीशी अल्पबला आज बरोबरीने किंबहूना वेगवेगळ्या पातळ्यांवर पुरूषांपेक्षाही अग्रणीने लढताना आणि जिंकताना दिसतीये! अशा बहुभूजा, आदीशक्ती स्त्रियांच्या आरोग्यासाठी हजारो हातांनी आयुर्वेदशास्त्र सज्ज आहे.